Ad will apear here
Next
डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या सत्काराचे आयोजन
पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम २० डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होईल.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे असतील.

‘डॉ. सबनीस यांच्या सत्कार सोहळ्याबरोबरच प्रबोधनयात्री कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मुंबईचे दीप पारधे, संदीप कांबळे, दौंडचे बबन धुमाळ, ठाण्याचे विजय जाधव, अमरावतीचे गुलाब फुलमाळी, पुण्याचे डॉ. भीम गायकवाड, संतोष हुले, पिंपरीचे शंकर आथरे व सांगवीच्या मधुश्री ओव्हाळ हे कवी आणि कवयित्री सहभागी होणार आहेत,’ अशी माहिती काषाय प्रकाशनचे संचालक व कवी चंद्रकांत वानखेडे यांनी दिली.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
गुरुवार, २० डिसेंबर २०१८
वेळ : सकाळी १०.३० वाजता
स्थळ : माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZQPBV
Similar Posts
‘समाजाला जोडणारा बंधुतेचा विचार रुजावा’ पुणे : ‘आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत संवेदना, सहवेदना याची आवश्यकता असून, माणसांचे संघटन व्हायला हवे. समाजाचे ज्ञान वाढले आहे; परंतु ‘शहाणपण’ हरवले आहे. अशावेळी समाजाला शहाणे करणाऱ्या आणि एकमेकांशी जोडणाऱ्या बंधुतेच्या विचारांची रुजवण होणे गरजेचे आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक विधिज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले
‘समाजमनाची वैचारिक स्वच्छता हे गाडगेबाबांचे स्वप्न’ पुणे : ‘संत गाडगेबाबा हे कृतीशील सुधारक होते. विचार, निर्णय आणि कृती या त्रिसूत्रीचा अवलंब करून कीर्तनातून समाजात जागृती केली. गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक परिवर्तनासाठी वेचले. त्यांचे विचार परखड असले, तरी त्यांना फारसा विरोध झाला नाही. कारण त्यांच्या विचारात आणि आचारात एकवाक्यता होती. आपल्या
पुण्यात नऊ डिसेंबरला ज्योतिषी संमेलन पुणे : गुरुकुल विश्वपीठातर्फे नऊ डिसेंबर २०१८ रोजी पुण्यात अखिल भारतीय ज्योतिषी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन मौलाना आझाद सभागृह (कोरेगाव पार्क) येथे सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत होईल,’ अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने डॉ. अजयचंद्र भागवत गुरुजी यांनी दिली.
‘बंधुतेशिवाय स्वातंत्र्य, समता अर्थहीन’ पुणे : ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या चार मूलभूत तत्वांवर भारताचे संविधान आधारले आहे. त्यातील केवळ स्वातंत्र्य व समता या दोन गोष्टींवरच अधिक भर दिला गेल्याने बंधुतेला दुय्यम स्थान मिळाले. परिणामी आज जाती-धर्म, गरीब-श्रीमंत अशा वर्गीय संघर्षात आपण अडकलो आहोत. बंधुतेशिवाय स्वातंत्र्य व समतेला अर्थ नाही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language